गेल्या वर्षाच्या अखेरीपासून गडचिरोलीत कमालापूर येथील हत्तींच्या गुजरात राज्यातील रवानगीसाठी आता केंद्र सरकारने राज्य वनविभागाला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. कमलापूरातील ४ हत्तींसह पातानील आणि ताडोबा येथील वयोवृद्ध आणि छोटी पिल्ले मिळून तब्बल १३ हत्तींची पाठवणी गुजरातमधील जामनगर येथील राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर वेल्फेअर ट्रस्टमध्ये केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील 13 हत्ती जामनगरला पाठविण्याचा केंद्र शासनाचा निर्णय
या १३ हत्तींना विदर्भातून गुजरातेत पाठवल्यानंतर कोणतेही काम दिले जाणार नाही. हत्तींना कोणत्याही धार्मिक कार्यात वापरले जाणार नाही. हत्तींना कोणत्याही प्राणिसंग्रहालयात प्रदर्शित ठेवले जाणार नाही, अशा राज्य वनविभागाने लादल्या आहेत. या अटींच्या पूर्ततेच्या हमीनंतरच १३ हत्तींना गुजरातेत रवानगी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र गुजरातला डझनभरहून अधिक हत्ती दिल्यानंतर तिथून वनविभागाने स्वतंत्ररित्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला सिंह मिळवण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार करावा, अशीही मागणी जोर धरु लागली आहे.
( हेही वाचा : सिंधुदुर्गात हत्तींची भटकंती )
गुजरात आणि राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वन्यजीव देवाणघेवाणच्या कामाला वेग आला आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीपासून कमलापूर येथील हत्तींना गुजरातेत पाठवण्यावरुन वाद सुरु झाला असतानाच मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंहाची जोडी मिळवण्यासाठी राज्याने पुन्हा गुजरात वनविभागाला आग्रही मागणी केली होती. याबाबतीत नुकतेच राज्यातील वनाधिका-यांची टीम गुजरात दौराही करुन आली होती. गेल्या पाच वर्षांपासून वनाधिका-यांना गुजरात वनविभागाकडून सिंह मिळण्याचा प्रयत्न फेल ठरत आहे. त्यातच आता गुजरातला राज्यातील हत्ती दिले जात असतील तर सिंह द्यायला आता काहीच हरकत नसावी, असा मुद्दा वन्यजीव वर्तुळात उपस्थित केला जात आहे. सिंहाच्या जोडीच्या मोबदल्यात गुजरातला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाघाची एक जोडीही देणार आहे. मात्र या प्रस्तावाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. गुजरात राज्यातील वनाधिकारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन वाघाची जोडी निवडतील, त्यानंतरच पुढील हालचालींना वेग येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
Join Our WhatsApp Community