६ कोटी रुपयांच्या रोकड लूट प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांसह १० जणांना निलंबित करण्यात आले आहे, दरम्यान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
( हेही वाचा : राज्यात पाणीसंकट! २८१ गावे, ७३८ वाड्यांना २७० टँकर्सने पाणीपुरवठा )
मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे, मदने आणि पोलीस कर्मचारी सह मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी येथे राहणारा खेळण्यांचा व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी १२ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास छापा टाकून ३० कोटी रुपयांची बेकायदेशीर रोकड ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यातील ६ कोटी रुपयांची रोकड काढून उर्वरित २४ कोटी रुपये कुठलीही कारवाई न करता परत केले होते.
हा प्रकार नुकताच एका तक्रार अर्जावरून समोर आला होता. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने ठाणे पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, गृहमंत्री यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज छाप्याच्या दरम्यान आणि पैशांचे बॉक्स पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना काढण्यात आलेले व्हिडीओ, फोटो अर्जासोबत दिले होते.
पोलीस कर्मचारी निलंबित
प्रसारमाध्यमातून हे वृत्त छापून येताच पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी चौकशीचे आदेश देऊन पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे हे प्रकरण सोपविले होते. प्राथमिक चौकशीत हे प्रकरण गंभीर असल्याचे उघड होताच या छाप्याच्या दरम्यान हजर असलेले पोलीस अधिकारी गीताराम शेवाळे, हर्षद काळे, मदने या तीन अधिकाऱ्यांसह ७ पोलीस कर्मचारी असे एकूण १० जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तसेच मुंब्रा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक कडलक, सहायक पोलिस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्याविरुद्ध विभागिय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ६ कोटीचे प्रकरण उघडकीस येताच गुन्हा दाखल होऊन अटकेच्या भीतीने मुंब्रा पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक शेवाळे आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ आजरपणाचे कारण पुढे करून रजेवर निघून गेले आहे.
Join Our WhatsApp Community