भाजपचे खासदार संभाजीराजे हे कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात असताना त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले. हा प्रकार सोमवारी, ९ मे रोजी घडला. या प्रकारमुळे तुळजापूरात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने तुळजापूरात संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून गुरुवारी, १२ मे रोजी तुळजापुरात बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, मंदिर तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
मूर्तीची झीज होत असल्याने गाभाऱ्यात जाण्यास बंदी
देऊळ कवायतमध्ये एक नियम आहे, हा नियम याच्या आधीपासून होता. मात्र विद्यमान जिल्ह्याधिकाऱ्यांनी जे तुळजापूर मंदिराचे प्रशासकीय प्रमुख देखील आहेत, त्यांनी मूर्तीची झीज होत असल्याने याच्या संवर्धनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास बंदी घातली आहे. त्यांनी याआधी देखील मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून लोकप्रतिनिधींना रोखले होत. तेव्हाही काही वाद झाले होते. मात्र तुळजाभवानी आणि कोल्हापूर यांचे नाते काही वेगळे आहे. कोल्हापूर संस्थांकडून मंदिरात काही पारंपरिक विधी केल्या जातात. हे खूप आधीपासून चालत आहे. अशातच ही घटना घडली तेव्हा हा वाद समंजस्याने मिटेल, असे बोलले जात होते. ही घटना घडल्यानंतर मंदिर संस्थांच्या वतीने दिलगिरीही व्यक्त करण्यात आली. मात्र ही भूमिका पुरेशी नाही, असे सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत ठरल्यामुळे, तुळजापुरात बंदची हाक देण्यात आली आहे.
(हेही वाचा कुतुबमिनार नव्हे विष्णूस्तंभ! हिंदूंची जैन मंदिरे तोडून त्यातून उभारला मनोरा! हिंदुत्ववाद्यांचा दावा )
Join Our WhatsApp Community