दिल्ली विमानतळावर 434 कोटींची हेरॉईन जप्त

134

नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी 434 कोटी रुपयांची हेरॉईन जप्त करण्यात आली. आफ्रिकन देश युगांडातून ट्रॉली बॅगेत लपवून आणलेले हे अंमलीपदार्थ आर्थिक गुप्तचर विभागाने जप्त केले आहेत. ही हेरॉईन 330 ट्रॉली बॅगमध्ये लपवून आणली होती.

(हेही वाचा – खासदार संभाजी राजेंना मंदिर प्रवेशापासून रोखले! तुळजापूर बंद!)

युगांडातून सौदी अरबच्या मार्गाने येणाऱ्या कार्गो विमानात हेरॉईनचा मोठा साठा येणार असल्याची गोपनीय माहिती आर्थिक गुप्तचर संस्थेला मिळाली होती. त्यानुसार कार्गो विमानातून आलेले ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यात जवळपास 62 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. एकूण 330 ट्रॉली बॅगांपैकी 126 बॅग असे होते, की ज्यात हेरॉईन लपवण्यात आले होते. इतर अन्य घटनांमध्ये पंजाब आणि हरियाणामधून ही 7 किलो हेरॉईन पकडले गेले. आर्थिक शाखेनुसार पकडलेल्या अंमलीपदार्थींची एकूण किंमत सुमारे 434 कोटी रुपये आहे.

शाहीन बाग ड्रग्सचा अड्डा

सीएए कायद्याच्या विरोधात मुस्लिमांनी हे आंदोलन केले होते. केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी या भागाचा राजकीय वापर केला, आज तोच भाग पुन्हा चर्चेत आला आहे. या ठिकाणी 50 किलो ड्रग्ज आणि 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.