उन्हाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी मुंबईत एसी लोकलची सेवा सुरू करण्यात आली. परंतु या लोकलच्या तिकीटाचे दर अधिक असल्याचे हवा तसा प्रतिसाद मुंबईकरांनी दिला नाही. परिणामी काही दिवसांपूर्वी एसी लोकलच्या तिकिटांचे दर कमी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. या निर्णयानंतर दर कमी झाल्याने प्रवाशांची संख्या अधिक वाढली आणि एसी लोकलची मागणी प्रवाशांकडून होताना दिसली. असे असतानाही हार्बर मार्गांवरील एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत नसल्याचे समोर आले आहे. अशातच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.
(हेही वाचा – कोरोनानंतर भारतात Tomato flu चं थैमान! ही आहेत लक्षणे )
एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर २० नवीन एसी लोकल गाड्या धावणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर ४४ लोकल ट्रेन धावत आहेत. तिकीटाचे दर कमी झाल्यानंतर एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र हार्बर लाईनवरील एसी लोकल सेवेला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावर एसी लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता आणखी कूल होणार आहे.
हार्बर मार्गावरील ट्रेन बंद करून त्या मुख्य मार्गावर
हार्बर मार्गांवरील एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही हे पाहून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याने हार्बर मार्गावरील एसी ट्रेन बंद करून त्या मुख्य मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद केल्या जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यातही आले होते.
Join Our WhatsApp Community