ऊर्जा कंपन्यांसाठी भारतीय रेल्वेकडून मागणीनुसार कोळशाच्या मालवाहतुकीत सातत्याने वाढ केली जात आहे. तसेच कोळसा कंपन्यांद्वारे साइडिंग्स / गोदामामध्ये आणण्यात आलेला देशांतर्गत सर्व कोळसा आणि वीज निर्मिती कंपन्यांनी बंदरात आयात केलेल्या कोळशाची उचल करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या विरोधात ब्रिजभूषण यांनी दिली उत्तर भारतीयांना शपथ )
कोळशाचे लोडिंग दररोज सरासरी 409 रेक
मे-22 मध्ये, ऊर्जा क्षेत्रासाठी रेकच्या उपलब्धतेत वाढ होऊन ती दररोज सरासरी 472 रेक झाली. ऊर्जा क्षेत्रासाठी दररोज संयुक्तपणे देशांतर्गत कोळशाचे 415 रेक आणि आयात कोळशाचे 30 रेक भरणे सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट कोळसा कंपन्या आणि भारतीय रेल्वे दोघांनीही ठेवले आहे. चालू महिन्यात, ऊर्जा कंपन्यांसाठी देशांतर्गत कोळशाचे लोडिंग दररोज सरासरी 409 रेक होते.
वाहतूककोंडी दूर करण्यासाठी विविध रेल्वेगाड्या रद्द
ओडिशातील कोळसा क्षेत्रात वारंवार होणाऱ्या संपाच्या समस्येमुळे विशेषतः तालचेर भागातील कोळशाचा साठा हलवण्याच्या कामावर परिणाम झाला आहे. तथापि, उर्जा क्षेत्रासाठी अधिकाधिक कोळसा लोडिंग करण्यासाठी रेल्वेने संपूर्ण भारत स्तरावर 60 अतिरिक्त रिकामे रेक ठेवले आहेत. कोळसा रेकच्या जलद पाठवणुकीसाठी कार्यान्वयन कार्यक्षमता वाढवणाऱ्या विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोळशाच्या रेकची जलद वाहतूक आणि वाहतूककोंडी दूर करण्यासाठी देशातल्या विविध रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विविध ऊर्जा प्रकल्पांसाठी कोळशाच्या रेकची अखंड आणि वेळेवर वाहतूक यावर भर देण्यात आला आहे. लोडिंग/अनलोडिंग पॉईंट्सवर प्रत्येक कामासाठी कोळसा रेक सज्ज ठेवणे आणि मार्गावरील हालचालींवर क्षेत्रीय स्तरावर विभागीय पथकांद्वारे देखरेख ठेवली जात आहे.
(हेही वाचा – एप्रिलमध्ये कोळसा उत्पादनात लक्षणीय वृद्धी; 29 टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारची माहिती)
गजबजलेल्या मार्गांवर लांब पल्ल्याचे आणि ताफा असलेले रेक वाढवण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षात कोळसा लोडिंगसाठी अतिरिक्त 100 रेकची सोय केली जाईल ज्यामुळे वीज क्षेत्रासाठी रेक उपलब्धता आणखी सुधारेल. याखेरीज, कोळशाची भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेने आधीच 1,00,000 पेक्षा अधिक मालडब्यांची खरेदी सुरू केली आहे. यामुळे मालडब्यांची उपलब्धता आणखी सुधारेल.
Join Our WhatsApp Community