१० मे २०२२ रोजी बेस्ट बदली बस चालकांनी आवश्यकता व इच्छा असल्यास बसवाहकाचे काम करावे यासाठी वैध बसवाहक परवाना असणे आवश्यक आहे. असे परिपत्रक बेस्ट वाहतूक विभागाने जारी करत बदली बस चालकांनी बसवाहकाचे काम करण्याबाबत माहिती दिली. ज्या बदली बस चालकांना बसवाहकाचे काम करण्याची इच्छा आहे. परंतु त्यांच्याकडे बसवाहक परवाना नाही अशा बदली बसचालकांना बसवाहक परवाना मिळवून देण्यास उपक्रमातर्फे सहकार्य केले जाणार आहे, असेही उपक्रमाने सांगितले आहे.
बसचालकांना वाहकाचे काम
तसेच, ज्या बसचालकांना वाहकाचे काम करण्याची इच्छा आहे व त्यांच्याकडे बसवाहक परवाना आहे त्यांनी लेखी अर्जासोबत बसवाहक परवान्याची छायांकित प्रत जोडून आपले लेखी अर्ज दिनांक ११ मे २०२२ ते दिनांक १७ मे २०२२ या कालावधीत ते काम करत असलेल्या आगार अधिकाऱ्यांकडे सादर करावेत. असेही उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
कर्मचारी वर्गाचा विरोध
परंतु उपक्रमाच्या या निर्णयाला कर्मचारी वर्गाने तीव्र विरोध करत, आम्ही बसचालक बस वाहकाचे काम करणार नाही. त्या पेक्षा बेस्टने स्वतःच्या मालकीच्या बस विकत घ्याव्यात. आम्ही त्या चालवू अशी भूमिका घेत कंत्राटीकरणास विरोध केला आहे.
Join Our WhatsApp Community