‘धर्मवीर’ सिनेमा 13 मे ला रिलीज होण्यामागे आहे मोठा योगायोग

158

‘धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे’हा सिनेमा 13 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हवा आहे. प्रेक्षकांमध्येही या सिनेमाची उत्सुकता आहे. आता 13 मे ही आनंद दिघे यांची पुण्यतिथी किंवा जयंती नाही. पण तरीही हा सिनेमा 13 मे रोजी प्रदर्शित होण्याचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

(हेही वाचा: नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’)

पण याबाबत एका पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. यामध्ये सिनेमातील नायक प्रसाद ओक हा आनंद दिघे यांच्या आर्माडा गाडीसोबत दिसत आहे. या गाडीचा नंबर आहे महाराष्ट्र ०५ जी २०१३.

2013 हा साहेबांचा आवडता नंबर, 13 हा आवडता शुभ अंक. आता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची प्रदर्शित तारीख ही 13 च आहे. त्यामुळे हा एक योगायोग असल्याचे या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

(हेही वाचा: तुमच्या खिशातली नाणी कुठून आली आहेत, हे कसं ओळखाल? ही आहे ‘ट्रिक’)

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे हे त्यावेळी पक्षाचे ठाणे शहर प्रमुख होते. त्यावेळचा ठाणे जिल्हा हा पालघर, डहाणूपर्यंत पसरला होता. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी शिवसैनिकांनी काढलेल्या वर्गणीतून ही आर्माडा गाडी खरेदी करण्यात आली होती. याच गाडीतून आनंद दिघेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता, अशी आठवण काही शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.