लॉकडाऊन नंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. जे विद्यार्थी, सरकारी हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना काळात पोलीस भरती होऊ शकली नव्हती. परंतु आता राज्यात लवकरच १२ हजार ६०० पोलिसांच्या भरती प्रक्रियेला परवानगी देण्यात आली असून यामुळे पोलिसांवरील ताण कमी होईल असे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. उत्कृष्ट पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
१२ हजार ६०० हून अधिक पोलीस पदे रिक्त
कोरोनाच्या काळात काही पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक पोलीस या काळात निवृत्तही झाले आहेत. स्वेच्छानिवृत्ती काहींना पदोन्नती देण्यात आली, तर काहींना विविध कारणांमुळे निलंबित आणि बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे राज्य पोलीस दलात सध्या १२ हजार ६०० हून अधिक पोलीस पदे रिक्त आहेत. या पदांसाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांता भेटवस्तू, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ृ
Join Our WhatsApp Community