तुमचा फायदा कशात? EMI वाढवण्यात की हफ्त्यांची संख्या? जाणून घ्या

144

अनेक बॅंकांनी गृहकर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गृहकर्जावरील ईएमआय वाढणार आहे. अनेक नवे कर्जदार त्यांचे हफ्ते कमी करण्यासाठी गृहकर्जाची मुदत वाढवू शकतात. उदाहरणार्थ, कर्जाचा कालावधी 20 वर्षांच्याऐवजी 25 वर्षांपर्यंत बदलू शकता. ज्यामुळे मासिक ईएमआय थोडा कमी होऊ शकतो, पण असे करणे ही मोठी चूक ठरु शकते, कसे ते पाहू….

कर्जाची मुदत वाढवल्याने किती नुकसान होते

आपण पाहू शकतो की 25 लाख रुपये कर्जाचा ईएमआय 20 वरुन 25 वर्ष केल्याने, मासिक हप्ता 38 हजार 765 रुपयांवरुन 35 हजार 339 रुपये होतो. मात्र कर्जावरील एकूण व्याजापोटी 43 लाख 3 हजार 587 रुपयांऐवजी तब्बल 56 लाख 1 हजार 688 रुपये द्यावे लागतील, तर कर्जाची वर्षे 10 वर्षांनी वाढवल्यास, एकूण व्याज 69 लाख 75 हजार 445 रुपये होते, म्हणजेच 10 वर्षांमध्ये व्याजात 26.50 लाख रुपयांची वाढ होईल.

( हेही वाचा: मंत्रालयासमोर दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात )

हे करा

किरकोळ ईएमआय कमी करण्याच्या नादात तुम्हाला लाखो रुपये मोजावे लागतील. त्यामुळे कर्जाचा कालावधी वाढवण्याऐवजी वेगवेगळ्या बॅंकाचे व्याजदर तपासून चांगल्या त्या बॅंकेत कर्ज ट्रान्सफर करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.