सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाच्या शिवाय महापालिका निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठीची कार्यवाही पुढे सरकवली आहे. राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. या १४ महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवातही झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका घेण्याचे आदेश ४ मे रोजी निवडणूक आयोगाला दिला. १० मे राेजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांसाठी एक आदेश काढला. या आदेशात संबंधित महापालिकांची अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. प्रभाग रचना राजपत्रात अंतिम केल्यानंतर लगेच निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकते. ओबीसी आरक्षणाशिवाय पहिल्यांदाच राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे आतापर्यंतचे चित्र आहे.
(हेही वाचा ज्ञानवापी मशिद प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका: मशिदीचे सर्वेक्षण होणारच; न्यायालयाचा आदेश)
पहिल्या टप्प्यातील निवडणुका होणाऱ्या महापालिका
नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, बृहन्मुंबई व ठाणे.
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणाऱ्या महापालिका
भिवंडी-निझामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, मालेगाव, परभणी, औरंगाबाद, नांदेड, नांदेड- वाघाळा, लातूर, चंद्रपूर, औरंगाबाद
Join Our WhatsApp Community