मोदींची माफी मागा आणि अयोध्येत या! बृजभूषण यांनी राज ठाकरेंना दिला ऑप्शन

160

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 5 जून रोजी होणा-या अयोध्या दौ-याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत येऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आता याचबाबतीत त्यांनी राज ठाकरे यांना एक ऑप्शन दिला आहे. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी आणि अयोध्येत यावं, असं विधान सिंह यांनी केलं आहे.

काय म्हणाले बृजभूषण सिंह

साधू संतांची माफी मागायची नसेल, आपल्याला राजकारणात रस असेल, तर राज ठाकरे यांनी भाजपच्या मुख्य नेतृ्त्वाची माफी मागावी. जी चूक झाली ती पुन्हा कधीही होणार नाही. उत्तर भारतीयांविरोधात मी जे काही बोललो ते पुन्हा कधीही बोलणार नाही. भाषेच्या आधारावरुन कोणामध्येही भेदभाव करणार नाही, अशी माफी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागावी, त्यांचं अयोध्येत स्वागत आहे, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः मुस्लिमांचाही राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला विरोध)

भाजप राज ठाकरेंच्या पाठिंब्यावर उभा नाही

भाजपचे कार्य फार जुने आणि मोठे आहे. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यावर उभा राहिलेला भाजप हा पक्ष नाही. संघाचे कार्य हे दीन दयाळांपासून सुरू झाले आहे. या कार्याची कमान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सांभाळत आहेत. यामध्ये राज ठाकरे यांचे योगदान कुठे आहे, असा सवालही बृजभूषण सिंह यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.