सध्या भारतात ४जी इंटरनेटचे जाळे सर्वदूर पसरले आहे, काही ठिकाणी ५जी इंटरनेट मिळते, पण आता 6G नेटवर्क भारतात येणार आहे. याचा स्पीड ५ जीपेक्षा ५० पट अधिक आहे. Samsung Electronics ने अलीकडेच नवीन योजना जाहीर केली आहे. ही योजना कंपनीच्या 6G नेटवर्कवर आधारित आहे.
6G 1 Tb पर्यंत इंटरनेट स्पीड देऊ शकतो
याबाबत माहिती देताना सॅमसंगचे कार्यकारी उपसंचालक आणि अॅडव्हान्स कम्युनिकेशन्स रिसर्च सेंटरचे प्रमुख संघयुन चोई यांनी सांगितले की, “आम्ही 6G कम्युनिकेशन टेकनॉलॉजि ओळखणे, विकसित करणे आणि सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देण्यासाठी आमची योजना खूप लवकर सुरू केली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढील हायपर कनेक्टेड अनुभव प्रदान करण्यासाठी आमचे व्हिजन आणि त्याचे परिणाम दाखवण्यासाठी आम्ही तयार आहोत. सोप्या भाषेत सांगायचे तर सॅमसंगने लवकरच बाजारात 6G टेकनॉलॉजी आणण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी नेक्स्ट जनरेशन कम्युनिकेशन स्टँडर्डचे कव्हरेज सुधारण्यावरही भर देत आहे. परिणामी कंपनी 1GHz अंतर्गत लो बँड ते 1 ते 24GHz रेंजमध्ये मिड बँड आणि अगदी 24 ते 300GHz रेंजमधील हाय बँडपर्यंत 6G साठी उपलब्ध असलेल्या सर्व बँडचा विचार करत आहे. सॅमसंगचा दावा आहे की, 6G 1 Tb पर्यंत इंटरनेट स्पीड देऊ शकतो. जे 5G नेटवर्कच्या 20Gbps पेक्षा 50 पट जास्त वेगवान आहे.
Join Our WhatsApp Community