मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज, शुक्रवारी भाजप नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना बोगस मजूर प्रकरणात अटक करून तात्काळ जामीन मिळणार आहे, या वृत्ताला माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे. न्यायालयाने दरेकर यांना अटक झाल्यास तात्काळ जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – मुंबई पोलीस दलातील ‘बॉम्ब स्कॉड’ एक दुर्लक्षित विभाग)
मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार त्यांना आज, शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयाने दरेकरांना दिलासा देत नुकताच जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दरेकर यांना अटक दाखवून त्यांच्या जामिनाची प्रक्रिया पोलीस ठाण्यातच पार पाडली जाणार आहे. प्रवीण दरेकर यांना अटक झाल्यास तत्काळ जामिनावर सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे दरेकर यांना अटक दाखवून त्यांच्या जामिनाची प्रक्रिया पोलिस ठाण्यातच पार पाडली जाणार आहे. ३५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन होईल. थोड्याच वेळात दरेकर हे एम आर ए मार्ग पोलिस ठाण्यात येणार आहेत.
काय आहे प्रकरण
मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होते.
याप्रकरणी दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने 35 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलका दोन जामीनदारांची हमी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात जाऊन दरेकर जामीन घेणार असल्याची माहिती आहे.
Join Our WhatsApp Community