चंद्रपूरातील दुर्गापूर येथील मानवी वस्तीतील हल्लेखोर मादी बिबट्याला वनविभागाने अखेर शुक्रवारी भल्या पहाटे पकडले. सात वर्षांची मादी बिबट्याने नुकताच तीन वर्षांच्या मुलीवर हल्ला केल्यानंतर बिबट्याला गोळी घालण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी वनविभागावर दबाव आणला होता. त्यामुळे बिबट्याला जिवंत पकडून जेरंबद करणे हे वनविभागासाठी आव्हानात्मक ऑपरेशन बनले होते. या बिबट्याने आतापर्यंत दहावेळा वनविभागाला चकवा दिला होता.
(हेही वाचा- आठ माणसांना ठार मारणा-या बिबट्याला गोळी घालण्याचे आदेश!)
वनविभागाकडून बिबट्याला गोळी घालण्याचे आदेश
गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून या मादी बिबट्याने माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली होती. दहा हल्ल्यांपैकी आठ जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे दुर्गापूर परिसरात या बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जनतेच्या दबावामुळे बिबट्याला गोळी घालण्याचे आदेशही वनविभागाने दिले होते. मात्र नागरी वसाहतीतच फिरणा-या बिबट्याला पकडण्याचे काम आव्हानात्मक असल्याने वनविभागाची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची वन्यप्राणी बचाव पथकाची टीम मध्यरात्री बिबट्याला शोधून जेरंबद करण्याच्या प्रयत्नात होती.
(हेही वाचा – ‘औरंगजेबाला आम्हीच कबरीत टाकलं; तुमचंही तेच करणार’, राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल)
गेल्या काही दिवसांपासून भल्यापहाटेपर्यंत वन्यप्राणी बचाव पथक मादी बिबट्याचा शोध घेत होते. अखेर शुक्रवारी भल्यापहाटे तिला रस्त्याच्या कडेला वनाधिका-यांच्या टीमने पाहिले. ती रस्त्यावर येताच बेशुद्धीचे इंजेक्शन बंदुकीच्या माध्यमातून दिले गेले. पहाट असल्याने लोकांची गर्दीही नसल्याने वनविभागाने तातडीने बिबट्याला ताडोबा ट्रान्झिट उपचार केंद्रात रवाना केले. तिची शारिरीक तपासणीही पूर्ण झाली असून, ती व्यवस्थित असल्याची माहिती ताडोबा व्याघ्र प्रलक्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रवीकांत खोब्रागडे यांनी दिली.
ताडोबा वन्यप्राणी बचाव पथकाची टीम
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींकांत खोब्रागडे, स्पेशल टायगर फोर्सचे सदस्य अतुल मोहुर्ले, भोजराज दांडेकर, अमोल तिखतट, सुनील ननावरे, तत्काळ बचाव टीमचे सदस्य अमोल कोपरे, अक्षय दांडेकर आणि पोलिस नाईक, अजय मराठे
Join Our WhatsApp Community