पवारांनी अप्रत्यक्षपणे केले इम्रान खानचे कौतुक

121

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईदनिमित्त पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अप्रत्यक्षपणे कौतुक केले आहे. पाकिस्तानातील युवा नेता देशाला दिशा देण्याचं काम करत होता, पण त्याला सत्तेतून बाहेर काढलं गेलं, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव त्यांच्यावर पवारांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

पाकिस्तानच्या जनतेला शांतता हवी आहे

पुण्यातील कोंडवा परिसरात झालेल्या ईद मिलन कार्यक्रमात शरद पवार यांनी भारत-पाकिस्तानच्या संबंधांबाबत भाष्य केले. पाकिस्तानातील सामान्य जनता आपली विरोधक नाही, पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेला शांतता हवी आहे. पण काही लोक राजकारण करुन लष्कराच्या मदतीने सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे, शरद पवार यांनी म्हटले आहे.

द्वेष नको, विकास हवा

भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान ज्याठिकाणी आपले बांधव राहतात, ती जनता आपली शत्रू नाही. पण काही लोक राजकारण करुन सैन्याच्या मदतीने पाकिस्तानातील सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोक शांततेसाठी संघर्ष करत आहेत. कुठलाही धर्म कोणाचाही द्वेष करण्यास शिकवत नाही. काही लोक जाती-पाती आणि धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्हाला द्वेष नाही तर विकास हवा आहे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.