मागील काही दिवसांपासून ट्विटरची विक्री होत आहे, अशी चर्चा सुरु आहे. यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले आहे, मात्र आता मस्क यांनी हा व्यवहार थांबवला आहे. मस्क यांनी हा करार होल्डवर टाकण्याचे कारण स्पॅम आणि फेक अकॉउंट असल्याचे सांगितले आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला मस्क यांनी ट्विटरला 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार केला होता.
मस्क यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली की, ट्विटर करार तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला आहे. ट्विटरने एका फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त 5% स्पॅम/बनावट खाती आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 22.9 कोटी वापरकर्ते आहेत. मस्क यांनी गेल्या आठवड्यातच या करारासाठी 7 अब्ज डॉलर्स सुरक्षित केले आहेत, जेणेकरून ते 44 अब्ज डॉलर्सचा हा करार पूर्ण करू शकतील. डील झाल्यापासून इलॉन मस्क हे ट्विटर प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेली बनावट खाती काढून टाकण्याबद्दल बोलत आहे. ते कराराच्या वेळी म्हणाले होते की, जर हा करार झाला तर त्याचे प्राधान्य बनावट खाती काढून टाकण्यावर असेल.
(हेही वाचा आनंद दिघेंच्या मृत्यूवर आजही विचारला जातोय प्रश्न, गूढ कायम!)
ट्विटरचे शेअर घसरले
ट्विटर करार होल्डवर ठेवल्याची माहिती समोर येताच ट्विटरच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली. प्री-मार्केट ट्रेडिंगमध्येच कंपनीचे शेअर्स जवळपास 20 टक्के घसरले. जर इलॉन मस्क या डीलमधून मागे हटले तर ट्विटरच्या नवीन डीलची किंमत कमी केली होईल. मात्र हा करार रद्द झाल्यास मस्क यांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community