मध्य रेल्वे मार्गावर रविवार १५ मे रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.
( हेही वाचा : ‘या’ लोकांसाठी बूस्टर डोसमधील अंतर केले कमी )
मध्य रेल्वे मार्गावर या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक
- माटुंगा – मुलुंड धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या उपनगरीय धीम्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने स्थानकांवर पोहोचतील.
- ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या मुलुंड स्थानकापासून जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
-
- हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.५४ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी करता सुटणाऱ्या गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या गाड्या बंद राहतील.
View this post on Instagram
मेगाब्लॉक कालावधीत विशेष गाड्या
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल – वाशी – पनवेल विभागादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकांतून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
Join Our WhatsApp Community