उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीसाठी का करू शकणार नाहीत मतदान?

187

देशातील एकूण 57 राज्यसभा जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 खासदारांच्या जागेसाठी मतदान घेण्यात होणार आहे. पण या खासदारांच्या निवडणूक प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होऊ शकणार नाहीत. संविधानातील तरतुदीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत.

…म्हणून करू शकत नाहीत मतदान

15 राज्यांतील एकूण 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ जून-ऑगस्टमध्ये संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 10 जून रोजी निवडणूक घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांच्या जागा रिक्त होत असून, या जागांसाठी निवडणूक होणार आहे. भारतीय संविधानानुसार, राज्यसभा खासदारांच्या निवडणुकीत राज्य विधानसभेत निवडून आलेले सदस्य भाग घेऊ शकतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेतील सदस्य असल्यामुळे, राज्यघटनेतील तरतुदीनुसार उद्धव ठाकरे हे राज्यसभा खासदारांच्या निवडणुकीत सहभागी होण्यास अपात्र आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीत सहभागी होऊन मतदान करू शकणार नाहीत.

(हेही वाचाः राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक! महाराष्ट्रातील या ‘सहा’ खासदारांचा समावेश)

या सहा जागांसाठी होणार निवडणूक

महाराष्ट्रातील 19 पैकी एकूण सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यामध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम यांचा कार्यकाळ संपत आहे. तर भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांच्या जागांसाठी सुद्धा निवडणूक होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.