ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा करता अखेर मागास आयोग सक्रीय होणार 

112
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने ३ टेस्ट पूर्ण केली नाही, ज्यामध्ये इम्पेरिकल डेटा मिळवणे हा महत्वाचा मुद्दा होता. मात्र राज्य सरकारने त्याची पूर्तता केली नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात याव्यात, असा आदेश दिला. त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी केली आहे. त्याच वेळी राज्य सरकारने आता इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी स्थापन केलेल्या समर्पित मागास आयोगाचा राज्यस्तरावर दौरा निश्चित केला आहे. 21 मे ते 28 मे या दरम्यान हा आयोग राज्यातील पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोकण, अमरावती आणि नागपूर विभागीय कार्यालयामध्ये नागरिकांची मतं जाणून घेणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन या समर्पित आयोगाचे सदस्य सचिव पंकज कुमार (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

असा असणार आयोगाचा दौरा!

समर्पित आयोग हा शनिवारी, 21 मे रोजी सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे भेट देतील. रविवार, 22 मे रोजी सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे जाणार आहेत. तर त्याच दिवशी सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे भेट देतील. बुधवार 25 मे रोजी दुपारी 2.30 ते दुपारी 4.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे भेट देतील. शनिवारी, 28 मे रोजी सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती तर  याच दिवशी सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे भेट देतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.