७३ वर्षांनी पहिल्यांदाच भारतीय पुरूष बॅडमिंटन संघ थॉमस चषकाच्या अंतिम फेरीत

129

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने शनिवारी ऐतिहासित कामगिरी करत थॉमस चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तब्बल ७३ वर्षांनी प्रथमच भारतीय पुरूष संघाने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत मलेशियावर विजय मिळवत भारताने आपले पदत निश्चित केले होते. पण आता केवळ कांस्यपदकावर समाधान न मानता थेट सुवर्णपदकाच्या शर्यतीत भारतीय बॅडमिंटन पुरूष संघाने धडक मारली आहे.

( हेही वाचा : कोकणात जाणारे प्रवासी विस्टाडोमच्या प्रेमात! )

भारतीय संघ अंतिम फेरीत 

पुरूष एकेरीच्या पहिल्या सामन्यात डेन्मार्क व्हिक्टर आक्सेल्सेनने २१-१३, २१-१३ अशा फरकाने सेनवर विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली त्यानंतर दुहेरी सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी २१-१८. २१-२३, २२-२० अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवून सामना १-१ बरोबरीत आणला. त्यानंतर श्रीकांत किदम्बीने आंद्रेसला पराभूत केले व भारताला २-१ आघाडी मिळाली. अटीतटीच्या लढाईत प्रणॉयने पुन्हा एकदा अविश्वसनीय कामगिरी करत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.