उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाने दरवाजा उघडताच त्याला करंट लागला. जवळ असलेल्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
तरुणाच्या मृत्यूनंतर लोकांचा गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार, लिसाडी रोडवर इंडिया वन बॅंकेचे एक एटीएम आहे. कोतवाली भागात राहणारा दानिश एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी दरवाजा उघडताच त्याला शाॅक लागला. ही घटना घडताच लोकांची गर्दी झाली. लोकांनी त्याला कसेबसे दरवाज्यापासून लांब केले. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्याचा मृत्यू झाला. दानिशच्या मृत्यूनंतर परिसरातील लोकांनी एटीएमबाहेर मोठा गोंधळ घातला.
( हेही वाचा: मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा )
कंपनीविरोधात गुन्हा दाखल
एटीएमला विजेचा सप्लाय करण्यासाठी जी तार लावण्यात आली होती. ती दरवाजावरुन जात होती. मात्र मध्येच ती कट झाली असल्याने, त्यातून करंट येत होता. यामुळेच दानिशलादेखील शाॅक लागला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याप्रकरणी एटीएम असणा-या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली असून, अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Join Our WhatsApp Community