जगभरातील अंदाजे 5 हजार 245 पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये घट होत असल्याचा, संशय व्यक्त केला जात आहे. जैवविविधतेचे नुकसान रोखण्यासाठी संवर्धनाचे परिणाम अपुरे पडत असल्याचे, एका संशोधनातून समोर आले आहे. मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी (MMU) च्या नेतृत्वाखालील केल्या गेलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास यामुळे हे पक्षी नाहीशे होत असल्याचे समोर आले आहे.
…तर 50 टक्के प्रजाती वेगाने कमी होताहेत
मॅंचेस्टर मेट्रोपाॅलिटिन विद्यापीठाच्या नेतृत्वात झालेल्या स्टेट्स ऑफ द वर्ल्ड बर्डस या पर्यावरण आणि संसाधनांच्या वार्षिक पुनरावलोकनाच्या अभ्यासात जगभरात अस्तित्वात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजांतींपैकी सुमारे 48 टक्के प्रजातींची संख्या कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर भारतातील 80 टक्के पक्षी प्रजाती नाहीशा होत असून 50 टक्के प्रजाती वेगाने कमी होत असल्याची माहिती स्टेट्स ऑफ इंडियाज बर्ड्सच्या 2020 साली प्रकाशित झालेल्या अहवालात दिली आहे.
( हेही वाचा: ब्राम्हणांचा तुला मत्सर! कोण रे तू? शरद पवारांवरील FB पोस्ट केतकी चितळेला भोवणार, गुन्हा दाखल )
भारतात या प्रजाती धोक्यात
भारतातील सामान्य पक्ष्यांच्या काही टक्के प्रजाती दीर्घकाळ स्थिर आहेत किंवा वाढल्या आहेत, तर गेल्या पाच वर्षांत काही प्रजातींच्या संख्येत घट झाली आहे. एकूणच 101 प्रजातींचे वर्गीकरण उच्च संवर्धन चिंता म्हणून केले गेले आहे. ज्या प्रजाती सर्वाधिक कमी झाल्या आहेत, त्यात व्हाइट- रम्पेड गिधाड, घार, रिचर्डस पिपिट, इंडियन वल्चर, लार्ज-बिल बिल्ट लीफ वाॅरलर, पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर आणि कर्ल्यू सॅंडपीपर. यापैकी काही जागतिक पातळीवर धोक्यात आलेल्या आहेत.
Join Our WhatsApp Community