शिवसेनेच्या बीकेसी येथील सभेमध्ये शिवसेनेच्या फायर ब्रँड आजीची चर्चा सुरु झाली. शिवसेनेच्या फायर ब्रँड चंद्रभागा शिंदे या राणा दाम्पत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करत होत्या. ‘झुकेगा नही’, असे आजी चंद्रभागा शिंदे म्हणाल्या. त्यानंतर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी आणि दोन मुलगे यांना घेऊन ते आजी चंद्रभागा शिंदे भेटायला गेले.
उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास दिला
उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेच्या फायरब्रॅंड चंद्रभागा आजी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास दिला जात असल्याची भावना चंद्रभागा आजी यांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांना इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community