कोकण रेल्वेने प्रवास करण्याच्या चाकरमान्यांसाठी एक मोठी बातमी. रविवारी पहाटेच्या सुमारास कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गवर धावणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला असल्याने कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विलंबाच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
इंजिनात कोणता बिघाड झाला हे अद्याप अस्पष्ट
दरम्यान, मुंबईहून निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली कोकण कन्या गोव्यापासून साधारण अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली. मात्र इंजिनमध्ये नेमका कोणता बिघाड झाला आहे, हेही अद्याप अस्पष्ट आहे. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होईल, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
(हेही वाचा – आता RTO च्या फेर्या मारणे होणार बंद! कारण…)
विलवडे स्थानकात कोकण कन्या दोन तास थांबून
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुटते. पहाटे साडेपाचच्या सुमारास रत्नागिरी सोडल्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकाच्या दिशेन तिचा प्रवास सुरू होतो. मात्र त्याचवेळी गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने ही एक्सप्रेस विलवडे रेल्वे स्थानकात दोन तास थांबून आहे. रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाला. त्यानंतर कोकण रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे समोर आले.
Join Our WhatsApp Community