कोकणातील ‘ही’ दोन ठिकाणं ठरली ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’!

169

कुठेही फिरायला जायचे म्हटले तरी मित्र-मंडळी आणि फॅमेली पिकनिकसाठी कोकणातील कित्येक ठिकाणांना सर्वाधिक पसंती दिली जाते. कमी दिवसात जास्त रिलॅक्स होण्यासाठी कोकण हे महाराष्ट्रातील बेस्ट प्लेस असल्याचे पुन्हा समोर आले आहे. धार्मिक पर्यटन स्थळाबरोबरच पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या गणपतीपुळेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ‘बेस्ट रिसोर्ट ऑफ दि इयर’ आणि ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ पुरस्कारांनी गौरव केला आहे. तसेच गुहागर तालुक्यातील वेळणेश्‍वरलाही ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’चा पुरस्कार मिळाल्याची माहिती मिळतेय. गणपतीपुळेला धार्मिकतेबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही पर्यटकांनी अधिक पसंती दिली.

नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील

देश आणि विदेशातील पर्यटकांची गणपतीपुळेला पहिली पसंती असते. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचप्रमाणे बोट क्लबसारख्या जलक्रीडा सुरू केल्या आहेत. शुक्रवारी (ता. १३) मुंबईत झालेल्या पर्यटन महामंडळाच्या आढावा बैठकीत हे जाहीर करण्यात आल्याची माहिती कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी दिली.‘वेडिंग– बर्थ डे डेस्टिनेशन’ म्हणूनही गणपतीपुळेत नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा)

यांचाही होणार सन्मान

२०२१-२२ या आर्थिक वर्षात एमटीडीसीला १ कोटी २० लाखांचा निव्वळ नफा मिळवून देणाऱ्या गणपतीपुळे रिसॉर्टला ‘रिसॉर्ट ऑफ दि इयर’चा गौरव मिळाला आहे. ‘सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे रिसॉर्ट’ तसेच इंटरनेटद्वारे उत्तम सुविधा उपलब्ध करून देणारे येथील व्यवस्थापक वैभव पाटील यांचाही सन्मान होणार आहे.वेळणेश्‍वर, रायगड तालुक्यातील हरिहरेश्‍वर यांनाही बेस्ट ‘रिव्ह्यू ऑफ दि इयर’चा सन्मान मिळाला असून या रिसॉर्टचे व्यवस्थापक अनुक्रमे स्वप्निल पवार आणि सुभाष चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला आहे. कुणकेश्‍वर रिसॉर्टचे सिद्धेश चव्हाण यांना पदार्पणातच उत्तम काम केल्याबद्दल त्यांचाही सन्मान होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.