केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?

200

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे सध्या चर्चेत आहे. केतकी चितळे आणि वाद हे काही नवे नाही. कधी मालिकांवरून तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट यामुळे ती आणि वाद याचं समीकरण ठरलेलं आहेच. आता ती पुन्हा शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. केतकी चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. तरीही वेळोवेळी तिने आपण एपिलेप्सी या आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शरीरावर आणि मेंदूवर ताबा नसतो असेही तिने म्हटले आहे. एपिलेप्सीलाच मराठीत अप्समार असेही म्हटले जाते. काय आहे तो नेमका आजार जाणून घ्या…

(हेही वाचा – पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी)

एपिलेप्सी म्हणजे काय?

एपिलेप्सी हा मानसिक विकार नव्हे तर मेंदूचा आजार आहे. तो संसर्गजन्य नाही. मेंदूमध्ये एक इलेक्ट्रिक सर्किट असते त्यामुळे असामान्यपणे मेंदूला अटॅक करतात. यामुळे मेंदुत काही रासायनिक बदल होतात. एपिलेप्सी या आजाराला अपस्मार असेही संबोधले जाते. या आजारामुळे मेंदु एक्सिसेव्ह स्टेजमध्ये जातो. यामध्ये रुग्णाची शरीर प्रक्रिया बदलते. मिळालेल्या माहितीनुसार, मेंदुतील केमिकल्स व मेंदुच्या प्रक्रियेत झालेल्या बदलांमुळे फिट्सची समस्या उद्भवते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शारिरीक लक्षणे दिसून येतात. काही पेशंट हातवारे करतात. तर काहींचा व्यवहार बदलतो. ‘इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम’ च्या माध्यमातून हे बदल दिसून येतात.

या आजाराची लक्षणे कोणती?

  • सातत्याने आकडी येणं हे या आजाराचं मुख्य लक्षण आहे.
  • हा दीर्घकालीन आजार आहे.
  • अपस्मार अतिशय दुर्मिळ असा आजार आहे.
  • हा आजार कधीच पूर्ण बरा होत नाही. मात्र यावर नियंत्रण ठेवता येतं.
  • या आजारामुळे रूग्णाच्या मेंदूचे शरीरावर नियंत्रण राहत नाही
  • व्यक्तीचे संतुलन ढासळते
  • अशक्तपणा येतो आणि तोल सुटून व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जाते
  • शरीर आकडते, झटके येतात. यामुळे विचित्र हालचाली होतात
  • जीभ किंवा ओठ दातांनी चावली जाते, दातखिळी बसते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.