उन्हाळ्यात तशी अनेक फळे मिळतात. मात्र वर्षभर खवय्ये ज्या फळाची वाट पाहतात तो फळांचा राजा आंबा बाजारात आला आहे. आंबा म्हटलं की, तो खाण्याचा मोह आवरता येत नाही. आंबा हा खायला रसाळ आणि गोड असला की मग बाकी काही नको… मात्र बाजारात आंबे खरेदी करता कित्येकदा ग्राहकांची फसवणूक होते. ती होऊ नये म्हणून ही बातमी नक्की वाचा…
आंब्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. परंतु यापैकी चांगले आणि पिकलेला आंबे कसे शोधायचे? नक्की कोणता आंबा चवीला चांगला असेल? हे ओळखणं तसं कठीण आहे. ज्यामुळे बाजारातून आंबा विकत घेण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आता आंबा विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घ्या…
(हेही वाचा – आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ! नाहीतर…)
आंबे खरेदी करताना ते गोड आहे हे कसे ओळखाल?
तुम्ही आंबा खरेदी करता तेव्हा त्याच्या रंगापेक्षा त्याच्या सालीचा जास्त विचार करा. आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकलेला असेल त्याच्या सालीवर एक डागही पडत नाही, तर केमिकल टाकून पिकवलेल्या आंब्यावर डाग दिसू लागतात.
गोड आंबे खरेदी करण्यासाठी काही टिप्स
- गोड आंबा घ्यायचा असेल, तर त्याला दाबून त्याचा वास घ्या. आंब्याचा सुगंध एकदम स्ट्राँग येत असेल, तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आणि गोड आहे असे समजावे.
- आंब्यापासून अल्कोहोल किंवा रसायनाचा वास येत असेल, तर असा आंबा चुकूनही खरेदी करू नका, कारण असा आंबा खाल्ल्याने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते.
- अनेक वेळा वरून पिकलेला आंबा आतून कच्चा असतो. त्यामुळे थोडा दाबून आंबा खरेदी करा. परंतु जास्त पिकलेले आंबे खरेदी करू नका कारण ते आतून कुजलेले असू शकतात.