फडणवीसांच्या सभेत राज ठाकरे झाले उद्धव ठाकरेंचे पुतणे

152

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रविवार 15 मे रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे सभा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या सभेला उत्तर देण्यासाठी भाजपकडून या सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेत फडणवीस उद्धव ठाकरे यांना नेमकं काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावेळी फडणवीसांच्या भाषणाआधी भाजप नेते आरयू सिंह यांनी केलेल्या एका विधानाने सगळ्यांचे डोळे चमकले. आरयू सिंह यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांचे पुतणे असा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

(हेही वाचाः भाजपच्या मुंबईतील सभेत फडणवीसांसाठी गायकाला दाखवली ‘जागा’)

काय झाले नेमके?

देवेंद्र फडणवीस यांच्या गोरेगाव येथील सभेसाठी भाजपचे असंख्य नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्याआधी भाजपचे इतर नेते भाषण करत होते. त्यावेळी मुंबईतील नेते आरयू सिंह हे भाषण करत असताना, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे तुमचे पुतणे आहेत. तुम्ही लहानपणापासून एकत्र लहानाचे मोठे झाला आहात. पण राज ठाकरे यांच्यावर घाणेरड्या भाषेत टीका करणा-या अकबरुद्दीन ओवैसीला हैद्राबादमध्ये परत जाण्यापूर्वी जेलमध्ये टाकणे तुम्हाला जमले नाही. तुमचं हिंदुत्व कुठे गेलं आहे’,असे विधान केले. त्यामुळे भाजप नेत्यांनीही त्यांच्या या विधानानंतर कानगोष्टी करायला सुरुवात केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.