मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे सभा घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांची सभा ही मास्टर सभा नाही, तर लाफ्टर सभा असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
लाफ्टर शो शेवटपर्यंत संपला नाही
उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी झालेली सभा ही मास्टर सभा असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत होते. पण काल सभा झाल्यानंतर लक्षात आलं की ही मास्टर नाही तर लाफ्टर सभा होती. शेवटपर्यंत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील असं आम्हाला वाटत होतं, पण हा लाफ्टर शो शेवटपर्यंत संपला नाही, अशी खोचक टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
कालची सभा कौरवांची
उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाबाबत कधीही भाष्य केलं नाही. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत 100 सभांची बाप सभा असल्याचे सांगण्यात येत होते. खरं तर त्यांचं बरोबर आहेच कारण कौरवांसोबत 100 होते आणि पांडवांसोबत पाच. त्यामुळे काल झालेली सभा ही कौरवांची होती, तर आजची सभा ही पांडवांची आहे.
Join Our WhatsApp Community