मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी झालेल्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी फडणवीसांसोबतच भाजपच्या इतरही नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत ठाकरे सरकारला सवाल विचारत उंदीर मारण्याच्या कंत्राटावरुन टीका केली. जे उंदरांनाही सोडत नाहीत ते कसले वाघ, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
(हेही वाचाः वाघाचे फोटो काढून कुणी वाघ होत नसतं, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना चिमटा)
मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार
पैसे खायचे तर कुठे खायचे, नाल्यात खाल्ले, गटारात खाल्ले, रस्त्यात खाल्ले, पेंग्विनमध्ये खाल्ले आता तर उंदरांमध्येही खाल्ले. मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यासाठी कंत्राट दिले आहे. त्यासाठी एका वॉर्डात एका महिन्यात किती उंदीर मारले असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यावर त्यांनी 10 हजार उंदीर मारल्याचं सांगितलं. त्यासाठी 1 करोड रुपयांचा खर्च आल्याचे सांगितले. मेलेले उंदीर कुठे आहेत, यावर त्यांनी जमिनीत पुरल्याचे सांगितले. ती जमीन कुठे आहे तर त्यांनी सांगितलं त्यावर आम्ही झाडं लावली. ती झाडं वादळात पडून गेल्याचं आम्हाला सांगितलं. ती जागाही त्यांना दाखवता आली नाही. त्यामुळे यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. उंदरांनाही जे सोडत नाहीत ते कसले वाघ, अशा शब्दांत शेलारांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community