विद्युत इंजिनाने धावली कोकणकन्या एक्स्प्रेस

137

मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसने रत्नागिरी जिल्ह्यात निवसर-आडवलीपासूनचा पुढील प्रवास रविवारी १५ मे रोजी विद्युत इंजिनाने केला. रविवारी सकाळी रत्नागिरीत दाखल झालेली कोकणकन्या एक्स्प्रेस रत्नागिरीपासून पुढील प्रवासाला निघाली असता निवसर आणि आडवली स्थानकांच्या दरम्यान या गाडीच्या डिझेल इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे तेथेच असलेल्या एका मालगाडीच्या विजेचे इंजिन पुढील प्रवासासाठी या गाडीला जोडावे लागले.

हा मार्ग विजेवरील गाड्या धावण्यासाठी सज्ज

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे हा मार्ग विजेवरील गाड्या धावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे गेल्या १ मेपासून कोकण रेल्वे मार्गावरील १० गाड्या विद्युत इंजिनसह धावणार होत्या. मात्र काही कारणामुळे हा मुहूर्त साधला गेला नाही.  दरम्यान, रविवारी सकाळी कोकणकन्या एक्स्प्रेसचेच इंजिन निवसर ते आडवली दरम्यान बिघडले. याच वेळी या मार्गावरून धावणाऱ्या मालगाडीचे विजेचे इंजिन काढून ते कोकणकन्या एक्स्प्रेसला जोडून गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली.

(हेही वाचा – तुम्ही कोणाला ‘टकल्या’ म्हणून चिडवताय? तर सावधान! कारण…)

रविवारी पहाटेच्या सुमारास कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली होती. कोकण रेल्वे मार्गवर धावणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. रविवारी सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला असल्याने कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विलंबाच्या त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, मुंबईहून निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे सांगितले जात होते. शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली कोकण कन्या गोव्यापासून साधारण अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली. मात्र इंजिनमध्ये नेमका कोणता बिघाड झाला आहे, हेही अद्याप अस्पष्ट आहे. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होईल, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.