अंदमाानात दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वा-यांनी सलग तिस-या दिवशी आपली आगेकूच कायम ठेवली. आज सकाळी नैऋत्य मोसमी वा-यांनी अंदमान, निकोबारचा समुद्र व्यापल्याचे भारतीय वेधशाळेने जाहीर केले. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठीही वातावरण पोषक असल्याने श्रीलंकेपर्यंत मान्सून दोन-तीन दिवसांत पोहोचेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
नैऋत्य मोसमी वा-यांनी अंदमानचा समुद्र व्यापला
अंदमान समुद्रानंतर श्रीलंकेच्या मार्गातून केरळ राज्यातून नैऋत्य मोसमी वा-यांची एक शाखा भारतात प्रवेश करते. ही शाखा भारताचा बहुतांश भाग व्यापते. साधारणतः अंदमान पूर्ण व्यापण्यासाठी २२ मेपर्यंत नैऋत्य मोसमी वारे वेळ घेतात. यंदा मात्र अंदमानचा समुद्र नैऋत्य मोसमी वा-यांनी सहा दिवस अगोदरच अंदमानचा समुद्र व्यापला आहे. नैऋत्य मोसमी वा-यांनी बंगालच्या उपसागरातील आग्नेयकडील भागही व्यापला आहे.
(हेही वाचा – कोकण किनारपट्टीसह राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’)
भारतीय वेधशाळेने दिला इशारा
पुढील पाच दिवस अंदमान-निकोबार बेटांत प्रचंड गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु राहील. पूर्व बंगालच्या उपसागरात ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा इशारा भारतीय वेधशाळेने जाहीर केला आहे.
Join Our WhatsApp Community