सोमवारी उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला नुकताच जामीन मंजूर केला. या याचिकेवर निरीक्षण देताना न्यायालयाने असे निरीक्षण दिले की, ओठांचे चुंबन घेणे आणि लैंगिक अवयवाला स्पर्श करणे हा अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा ठरत नाही.
काय आहे प्रकरण?
मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७७ नुसार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पोक्सो हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र एफआयआर आणि मुलाच्या जबाबानुसार, आरोपीने त्याच्या ओठांचे चुंबन घेतले आणि त्याने त्याच्या गुप्तांगाला स्पर्श केला. सकृद्दर्शनी आरोपीचे हे कृत्य अनैसर्गिक लैंगिक गुन्हा होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवले.
(हेही वाचा – तुम्ही कोणाला ‘टकल्या’ म्हणून चिडवताय? तर सावधान! कारण…)
याप्रकरणी मुलाचा वैद्यकीय अहवाल वगळता न्यायालयाने कलम ३७७ लावण्यासाठीचा आणखी पुरावा काय आहे, याबाबत विचारणा न्यायालयाने आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी केली. तसेच मुलाच्या वैद्यकीय अहवालावरून अनैसर्गिक लैंगिक गुन्हा झाला आहे, असे दिसून येत नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, घरात पैसै कमी असल्याचे मुलाच्या पालकांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी मुलाकडे याबाबत विचारणा केली असता तो ऑनलाइन गेम खेळत असल्याचे समोर आले. आरोपीच्या दुकानात या ऑनलाइन गेमचे रिचार्ज करण्यासाठी त्याने ते पैसे खर्च केल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, असाच तो मुलगा ऑनलाइन गेम रिचार्जसाठी एकदा गेला असताना, यावेळी आरोपीने ओठांचे चुंबन घेतले आणि त्याच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचेही मुलाने पालकांना सांगितले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ आणि ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community