देशातील ३५ हजार रेल्वे स्टेशन मास्तर सामुहिक रजेवर

176

रेल्वेचे खासगीकरण व व्यावसायिकरण बंद करणे यांसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ३१ मे रोजी देशातील ३५ हजार स्टेशन मास्तर १ दिवसाची सामुहिक रजा घेणार आहेत. अशी माहिती ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनने पुण्यात दिली आहे.

( हेही वाचा : मोबाईल डेटा लवकर संपतोय? लगेच बदला या सेटिंग्ज )

स्टेशन मास्तरांच्या मागण्या काय आहेत?

  • रेल्वेचे खासगीकरण व कॉर्पोटायझेशन बंद करा.
  • पदनाम बदलासह संवर्गाचे वर्गीकरण करावे.
  • स्टेशन मास्तरांच्या रिक्त जागा तात्काळ भरा.
  • स्टेशन मास्तरांना सुरक्षा व ताण भत्ता द्या.
  • नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणे.
  • रात्रपाळी सिलींग मर्यादा 43 हजार 600 रुपयांचा आदेश रद्द करुन 1 जुलै 2017 पासूनचा रिकवरी आदेश परत घ्या.
  • एमएसीपीचा फायदा 1 जानेवारी 2016 पासून द्या.

आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल

या मागण्यांकरिता देशभरातील 35 हजार स्टेशन मास्तर 31 मे रोजी एक दिवसाची सामूहिक रजा घेणार आहेत, अशी माहिती ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एस्मा संघटनेचे विभागीय सचिव विश्वजीत किर्तीकर, मध्य रेल्वे झोनल सचिव एस.के.मिश्रा, मध्य रेल्वे झोनल कार्याध्यक्ष अजय सिन्हा, स्टेशन प्रबंधक दिनेश कांबळे उपस्थित होते.

चंद्रात्रे म्हणाले, रेल्वे स्टेशन मास्तरांच्या प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी यापूर्वी पाच टप्प्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करुनही अद्याप रेल्वे बोर्डाने गांभीर्याने आमच्या मागण्यांचा विचार केला नसल्याचे दिसून येत आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना ईमेल पाठविण्यात आले, रात्रीच्या पाळीवरील स्टेशन मास्तरांनी मेणबत्त्या पेटवल्या, एक आठवडा काळा बिल्ला लावून आंदोलन केले, एक दिवसाचा उपवास केला, प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर रेल्वेचे कामकाज सुरळित ठेवण्यासाठी निर्देशने करण्यात आलेली आहे. आगामी काळात रेल्वे प्रशासनाने योग्य भूमिका न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वे प्रशासनावर राहील असा इशारा ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोशिएशनतर्फे देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.