हापूस आंब्याची आवक वाढली, दरात घट

144

हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात हापूसची आवक वाढली असून. दरात घट झाली आहे. सर्वसामान्यांना परवडेल असे फळ मिळत असल्यामुळे बाजारामध्ये आर्थिक उलाढाल वाढली आहे. मोठी फळे बाजारात विक्रीसाठी पाठवली जात असून, छोटी आणि डाग असलेली फळे कॅनिंगला दिली जात आहेत. मात्र तेही उत्पादन कमी असल्याने कॅनिंगचा दर सर्वसाधारण किलोला ३४ रुपयांपर्यंत मिळत आहे.

सर्वसामान्यांना चाखता येणार आंबा

उत्पादनात झालेली घट, हंगामाच्या सुरवातीला वाढलेली मागणी यामुळे फळांचा राजा हापूस याची आंब्याच्या बाजापेठेत एक वेगळाच तोरा होता. उत्पादन घटल्यामुळे यंदा सर्वसामान्यांना अगदी अखेरच्या टप्प्यातच चव चाखायला मिळणार, असे वाटत होते. त्यानुसार अखेरचा हंगाम सुरू झाला आहे. एप्रिलनंतर तिस-या मोहराचे उत्पादन वाढेल, असा अंदाज अक्षयतृतीयेच्या दरम्यान वर्तवण्यात आला होता. त्यानुसार उत्पादनात वाढ झाली असून, मागणी घटली आहे. सुरुवातीला १ डझन आंब्यासाठी ग्राहकांना १ हजाराहून अधिक रुपये मोजावे लागत होते. पण आता आवक वाढल्याने डझनभर आंबे १५० ते ४०० रुपये दराने मिळत आहेत. दर कमी झाल्याने आंबा उत्पादकांनी माल मार्केटमध्ये पाठवण्याऐवजी जागेवरच कंपन्यांना विकण्यास प्राधान्य दिले आहे.

( हेही वाचा: माथेरानमध्ये धावणार मिनी बस! )

जवळपास हजाराने दर झाले कमी

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई मार्केटमध्ये हापूसची आवक सुरू झाली होती. तेव्हा दिवसाकाठी ९० हजार पेट्यांची आवक होत होती. मात्र आता पुरवठा अधिक आणि मागणी कमी अशी अवस्था झाल्याने, दर घटले आहेत. काही दिवसांपूर्वी हापूसची एक पेटी ३ हजार ५०० रुपयांपर्यंत विकली जात होती. आता आवक वाढल्याने हीच पेटी १ हजार ते २ हजार रुपयांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी शेतक-यांनी थेट शीतपेये बनवणा-या कंपन्यांना जागेवर आंबा विक्रीला प्राधान्य दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.