सावधान! बेस्ट वीजग्राहकांनो तुमची होऊ शकते फसवणूक

143

मुंबईतील बहुतांश ठिकाणी बेस्टमार्फत वीजपुरवठा ( BEST Electricity Department) केला जातो. परंतु मागील काही महिन्यांचे वीजबिल अपडेट नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ शकतो. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट SMS वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येत आहेत.

( हेही वाचा : BEST विषयी काही तक्रार आहे का? घरबसल्या या ठिकाणी संपर्क साधा )

नागरिकांना बनावट SMS

अशा आशयाचा मेसेज बेस्ट विद्युत पुरवठा उपक्रमाची वीज वापरणाऱ्या निवृत्त बेस्ट कर्मचारी नागेश धोरे यांना आला. यानंतर त्यांनी मेसेज आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तुमचे बिल भरले नाही असे सांगण्यात आले परंतु धोरे यांनी बिल वेळेत भरल्याचे सांगितल्यावर तुमचे बिल अपडेट नाही असे त्यांना कळवले गेले. यावर नागेश धोरे यांना संबंधित व्यक्तीचा संशय येऊन त्यांनी मी ऑफिसमध्ये येऊन बिल भरतो असे सांगितल्यावर मी बीकेसीला असतो असे सांगितले. त्यानंतर मात्र या व्यक्तीने नागेश धोरे यांचा फोन उचलला नाही. हा अनुभव त्यांनी इतरांना  कळवत सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. अशाप्रकारचे मेसेज सध्या बेस्ट विद्युत पुरवठा विभागाची वीज वापरणाऱ्या नागरिकांना येत आहेत. नागेश हे बेस्टचे निवृत्त कर्मचारी असल्यामुळे त्यांना विद्युत पुरवठ्यासंबंधित काही समस्या असल्यास बेस्ट उपक्रमाच्या लॅंडलाईनवरून फोन येतात याची कल्पना होती म्हणून त्यांची फसवणूक झाली नाही.

वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बेस्ट विद्युत पुरवठ्यासंबंधित एसएमएस किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी बेस्ट विद्युत पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे नागेश यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.