सध्या राजकीय पक्ष एकमेकांबद्दल आक्रमक झाले आहेत, नैतिकतेचा कसलाही विचार न करता एकमेकांवर पातळी सोडून टीका करत आहेत. अशातच आता आंदोलनेही पातळी सोडून करू लागले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्या पुण्यात एक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी केंद्र सरकारचा महागाईविरोधात निषेध करण्याच्या हेतूने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्क अंडी फेकली.
विशाखा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात
पुणे दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाई आणि इतर मुद्द्यांवरून आंदोलन छेडले आहे. या दरम्यान आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्री स्मृती इराणी परत जात असताना त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीने अंडी फेकून मारली. पोलिसांनी विशाखा गायकवाड या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला अंडीफेक केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकीच्या परिसरात ही घटना घडली. विशाखा गायकवाड ही राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती पोलिसांनी ताब्यात घेतले. स्मृती इराणी या पुण्यात दाखल होताच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्यांच्याविरोधात सकाळपासूनच आंदोलन छेडले आहे. ज्या हॉटेलमध्ये स्मती इराणी थांबल्या होत्या त्या हॉटेलमध्येही घुसण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यावेळी वेळीत हस्तक्षेप करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
(हेही वाचा व्लादिमिर पुतिन यांना कर्करोगाचा गंभीर आजार!)
Join Our WhatsApp Community