मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी निमंत्रणपत्रिकेत पुण्यातील कोअर कमिटीतील १० जणांची नावे टाकण्यात आली, मात्र त्या वसंत मोरे यांचे नाव न घातल्याने वसंत मोरे नाराज झाले आहेत. आता मंगळवार, १७ मे रोजी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु झाले आहे. त्याकरता वसंत मोरे यांना फोन वरून संपर्क सुरु झाले आहेत, उद्या वसंत मोरे हे राज ठाकरे यांना पुण्यात भेटणार आहेत, अशी चर्चा आहे.
पुण्यात मनसेमध्ये घडामोडींना वेग
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका घेतल्यावर मनसेतून या भूमिकेला विरोध करणारे वसंत मोरे हे पहिले नेते होते. त्यानंतर त्यांना मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा सुरु होती. मात्र ठाण्यातील सभेत वसंत मोरे यांनी भाषण करून आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. पुण्यात मनसेमध्ये मागील काही दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरेंनी एकीकडे हिंदुत्वाचा मुद्या हाती घेऊन वाटचाल केली आहे.
राज ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन
त्याआधी राज ठाकरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. पण राज ठाकरे यांनी स्वत: वसंत मोरे यांना फोन बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. राज ठाकरे यांच्या फोनमुळे वसंत मोरे हे बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘दुपारी 3 वाजता मला राज ठाकरे यांचा मेसेज आला होता. पण मेसेज पाहिला नव्हता. त्यानंतर बाबर यांनी मला फोन केला आणि साहेबांनी भेटायला तातडीने बोलावले आहे, असे सांगितले. त्यानंतर लगेच साहेबांना फोन केला. त्यानंतर त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये माझ्याशी बोलले, ‘काय रे उठला नाही का, भेटायला ये’, त्यानंतर मी तातडीने त्यांना भेटायला गेलो, असे वसंत मोरेंनी सांगितले.
Join Our WhatsApp Community