‘नमस्कारा’मुळे सापडले बलात्कारी!

141

बलात्कार करून पळून जात असताना आरोपीने हात उंचावून एका दुकानदाराला केलेला नमस्कार यामुळे आरोपीची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर धारावी पोलिसांना या आरोपींचा माग काढत त्यांना विलेपार्ले येथून अटक केली. १० मे रोजी दिवसाढवळ्या धारावी सारख्या दाट वस्तीत झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण धारावी हादरली होती. एकट्या दुकट्या घरात राहणाऱ्या महिलांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण पसरले होते.

काय घडला प्रकार

उत्तर प्रदेशातील २० वर्षांची पीडित महिला ही २ महिन्यापूर्वीच लग्न करून सासरी आली होती. दुपारच्या सुमारास पीडित ही घरी एकटी असताना दोघे जण आले व त्यांनी तिला चाकुचा धाक दाखवून एक जण तिच्यावर बळजबरीने बलात्कार करीत होता तर दुसरा अत्याचाराचा प्रसंग मोबाईल फोनच्या कॅमेरात टिपत होता. त्यानंतर या दोघांनी तिला बाहेर याबद्दल कोणाला काही सांगितल्यास जीवे मारू, अशी धमकी देऊन निघून गेले. या घटनेनंतर पीडित विवाहिता मानसिक धक्का बसल्यामुळे तिला काहीच सुचत नव्हते, अखेर पती आणि सासरा घरी आल्यानंतर तिने तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी तात्काळ दोन अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

(हेही वाचा – ‘वसंता’ची नाराजी दूर करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न, थेट केला फोन)

१२५ सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले

या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपीबाबत कुठलाही पुरावा नसल्यामुळे आरोपीना शोधायचे कसे असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पीडितेच्या घरापासून दूरदूर पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते किंवा पीडिता आरोपीना ओळखत नसल्यामुळे आरोपीना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. धारावी पोलीस ठाण्याचे बळवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे आणि पथकाने धारावी परिसरातील कारखाण्यात काम करणारे शेकडो मजूर तपासण्यात आले, त्याच बरोबर धारावी येथील रस्त्यावर लावण्यात आलेले तब्बल १२५ सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासण्यात आले. दरम्यान एका सीसीटीव्हीमध्ये पीडितेने दिलेल्या वर्णनाची व्यक्ती दिसली, पोलिसांनी फुटेज तपासात असताना ती व्यक्ती जाताना हात उंचावून एका दुकानदाराला नमस्कार करताना फुटेजमध्ये दिसून आले. तपास पथकाने कुठल्या दुकानदाराला नमस्कार केला त्या दुकानदाराचा शोध घेण्यात आला. दुकानदाराला फुटेज दाखवले असता त्याने फुटेज मधील व्यक्तीला ओळखून ही कॉम्प्युटरचे प्रिंटर रिफिल करून देण्याचे काम करतो असे सांगून पोलिसांनी त्याची संपूर्ण माहिती दिली.

गुन्ह्याची कबुली

धारावी पोलिसांनी विलेपार्ले येथून अनिल चौहान (१९) आणि त्याचा सख्खा भाऊ निलेश चौहान (२०) या दोघांना अटक करून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अनिल चौहान हा प्रिंटरचे रिफिल करण्याचे काम करतो, धारावीत त्याचे बरेच ग्राहक असून तो दुकानदारांना प्रिंटरचे रिफिल करून देण्याचे काम करीत असल्यामुळे त्याला अनेक जण ओळखतात. तसेच त्याचे लहानपण धारावीत गेल्यामुळे त्याला धारावीतील गल्लीबोळ माहित आहे. पीडिता ही नुकतेच लग्न करून धारावीत आल्यानंतर जवळच्याच एका बागेत अनिल याला दिसली होती, त्याने तेव्हाच ठरविले होते की, तिला घरात एकटी असताना गाठायचे, त्यानंतर तो तिच्यावर पाळत ठेवून होता, ती घरात एकटी केव्हा असते त्याचा अंदाज घेऊ लागला होता आणि १० मे रोजी ती घरी एकटी असताना त्याने भावाला मदतीला घेऊन संधी साधली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.