मुंबई-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला हा अपघात झाला आहे. एसटी आणि आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत कारचा चक्काचूर झाला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या अपघातातून जगताप थोडक्यात बचावले असून त्यांना मुंबईकडे नेण्यात आले आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळतेय.
सुदैवाने कोणीही जखमी नाही
हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीनजिक झाला असून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसचा झाला. रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली ही घटना आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, संग्राम जगताप या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. ते मुंबईमध्ये सुखरूप पोहोचले आहेत.
(हेही वाचा – मुंबईतील ‘या’ भागातून प्रवास करणार असाल, तर ही बातमी महत्त्वाची…)
Join Our WhatsApp Community