CBI raid: काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांच्या 8 ठिकाणांवर सीबीआयचे छापे

224

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरासह 7 ते 8 ठिकाणांवर सीबीआयच्या पथकाने छापा टाकला असल्याची माहिती मिळतेय. हा छापा नुकत्याच झालेल्या तपासाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयच्या पथकाने कार्ती यांच्या घर आणि ऑफिसशिवाय अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई आणि तामिळनाडूमधील कार्तीच्या घरांवर हा छापा टाकण्यात आला आहे.

(हेही वाचा – १२० एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल )

या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, असे किती वेळा झाले, मी मोजणी विसरलो आहे. त्यांनी पुढे लिहिले की, हा छापा नोंदवला गेला पाहिजे.

305 कोटींचे प्रकरण

कार्ती चिदंबरम यांच्यावर एअरसेल-मॅक्सिस डील आणि INX मीडियाला 305 कोटी रुपयांचा विदेशी निधी मिळविण्यासाठी विदेशी गुंतवणूक मंडळाच्या मंजुरीशी संबंधित अनेक गुन्हेगारी खटल्यांचा सामना करावा लागत आहे. हा परदेशी निधी त्यांचे वडील पी चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांना मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे INX मीडिया केस?

सीबीआयने 15 मे 2017 रोजी आयएनएक्स मीडिया या मीडिया कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. INX मीडिया समूहाने विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (FIPB) च्या मान्यतेमध्ये 305 कोटी रुपयांचा विदेशी निधी मिळवण्यासाठी विविध अनियमितता केल्याचा आरोप आहे. 2007 मध्ये जेव्हा कंपनीला गुंतवणूक देण्यात आली तेव्हा पी चिदंबरम हे अर्थमंत्री होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.