१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील वॉन्टेड आरोपींना अटक

135

गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत ११९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींना अटक केली आहे. गुजरात एटीएसने अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सैय्यद कुरेशी या चौघांना अटक केली आहे. या चारही आरोपींना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. हे आरोपी दाऊद इब्राहिम याचे हस्तक आहेत.

( हेही वाचा : Bungee Jumping करण्यासाठी भारतातील टॉप ५ ठिकाणे… जाणून घ्या दर )

गुजरात एटीएसची मोठी कारवाई

१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर हे आरोपी परदेशी पळून गेले होते परंतु आता हे आरोपी बनावट पासपोर्टचा आधार घेत अहमदाबादमध्ये आले होते. या संदर्भात गुजरात एटीएसला माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. अबू बकर, युसूफ भटाका, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे पत्ते बदलले होते. त्यांच्या पासपोर्टमध्ये टाकलेली सर्व माहिती खोटी होती. तपास केल्यावर हे चौघेजण १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे उघड झाले.

वॉन्टेड आरोपी गडाआड

गुजरातचे दहशतवाद विरोधी पथक अटक केलेल्या चार आरोपींची चौकशी करत आहे. गुजरात एटीएसची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत वेगवेगळ्या 12 भागात सुमारे 2 तास हे बॉम्बस्फोट सुरू होते. पहिला स्फोट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजजवळ दुपारी दीड वाजता आणि शेवटचा स्फोट दुपारी ३:४० वाजता सी रॉक हॉटेल येथे झाला. या प्रकरणी टाडा न्यायालयाने याकूब मेमनसह १०० आरोपींना दोषी ठरवले होते, तर २३ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.