दापोली पोलिस स्टेशनला आग, परबांविरोधातले पुरावे जळल्याचा सोमय्यांना संशय

144

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप करणा-या किरीट सोमय्या यांनी आता आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे असलेल्या दापोलीतील पोलिस स्थानकाला आग लागल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे. त्यामुळे आता परबांच्या विरोधातील कागदपत्रे सुरक्षित आहे किंवा नाही, असा प्रश्न आता सोमय्या यांनी दापोली पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षकांना पत्राद्वारे विचारला आहे.

सोमय्या यांचं ट्वीट

आपल्या दापोली पोलिस स्टेशनला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत मी दिलेली तक्रार, अनधिकृत साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट, अनिल परब, सदानंद कदम यांसंबंधीचे केंद्र सरकार, राज्य सरकार, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी केलेली कार्यवाही, पोलिसांसोबत केलेले पत्रव्यवहार सुरक्षित आहे का, असे प्रश्न सोमय्या यांनी दापोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांना विचारले आहेत. याप्रकरणी मी मुख्य तक्रारदार असल्यामुळे आपल्याला या पुराव्यांची काळजी वाटत असल्याचे देखील सोमय्या यांनी या पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचाः असली-नकली कोण? सोमय्यांच्या निशाण्यावर आता रश्मी ठाकरे!)

माफिया सरकारला वाचवण्याचा प्रयत्न

14 मे रोजी दापोली पोलिस स्टेशनला आग लागली असून, यामध्ये परबांविरोधात असलेले पुरावे जळून खाक झाल्याची शक्यता किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे जुलै 2021 मध्ये ठाकरे सरकारने घोषित केले होते. पण अजूनही ते पाडण्यात आले नाहीत. उद्धव ठाकरे आपल्या माफिया सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.