दिल्लीतील ज्ञानवापी मशिदीवरुन आधीच वाद सुरू असताना आता दिल्लीतील जामा मशिदीबाबत एक नवा वाद उफाळून आला आहे. जामा मशिदीखाली औरंगजेबाने हिंदू देवी-देवतांच्या मूर्त्या गाडल्याचा दावा हिंदू महासभेकडून करण्यात येत आहे. या विरोधात हिंदू महासभा न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंदू महासभेचा दावा
दिल्लीतील जामा मशिदीविरोधात आता हिंदू महासभा आक्रमक झाली आहे. जामा मशिदीखाली मुघल बादशहा औरंगजेबाने त्यावेळी हिंदू देवी-देवतांच्या लाखो मूर्ती गाडल्याचा दावा हिंदू महासभेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन हिंदू महासभा न्यायालयात जाणार आहे. या देवी-देवतांच्या मूर्ती बाहेर काढण्यासाठी हिंदू महासभा न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे एकीकडे ज्ञानवापी मशिदीवरुन वाद सुरू असतानाच आता जामा मशिदीवरुनही वाद रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी ज्ञानवापी मशिदीतल्या तलावाचे पाणी उपसून तिथे व्हिडीओ ग्राफी करण्यात आली. मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारी पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. गेल्या चार दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरू आहे.
Join Our WhatsApp Community