तुमचं Facebook हॅक झालं तर काय कराल?

172

सोशल मीडियातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनमध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक या अॅप्लिकेशनचा समावेश होतो. बऱ्याचदा सोशल मीडियावरील फेक अकाऊंटचे प्रमाण वाढल्याने हॅकिंग सारखे प्रकार सातत्याने घडताना दिसताय. त्यामुळे सोशल मीडियावरील आपल्या अकाउंटबाबत युझर्स हे हळवे असल्याचे बघायला मिळते. फेसबुकवरील अकाउंट हॅक झाल्यास काय करावे कळत नाही. मात्र, अशा वेळी घाबरून न जाता हे हॅकिंग कसे रोखले जाऊ शकते त्याबद्दल जाणून घ्या…

हॅकिंग झालेच तर ….

जगात फेसबुकचे २ अब्ज ९३ कोटी तर देशात २४ कोटी युझर्स आहे. पण जर फेसबुक वापरताना कधीतरी तुमचं अकाऊंट हॅक झाले तर, पासवर्ड अँड सिक्युरिटी या पेजवर जाऊन पुढील बाबी तपासता येतील. फेसबुक अकाउंट कोणत्या डिव्हाइसशी जोडले गेले आहे, कुठल्या डिव्हाइसमध्ये तुम्ही लॉग-इन आहात इत्यादी.एखाद्या अनोळखी डिव्हाइसवर तुम्ही लॉग इन असल्याचे तुम्हास आढळले तर तातडीने ते डिव्हाइस तुमच्या अकाउंट सिस्टीममधून काढून टाका.

(हेही वाचा – विमानतळाचे ८४ कर्मचारीच फुल्ल टल्ली! DGCA च्या अहवालातून उघड)

  • फेसबुक अकाउंटच्या सेटिंग्ज आणि प्रायव्हसी सेक्शनमध्ये जा.
  • तिथे पासवर्ड आणि सिक्युरिटी हे पर्याय असतील ते निवडा
  • त्यामध्ये ‘चेंज पासवर्ड’ हा पर्याय निवडून पासवर्ड बदला.

हॅकिंगपासून कसे कराल संरक्षण

  1. पासवर्ड सुरक्षित ठेवा
  2. पासवर्ड वारंवार ठराविक कालावधीसाठी बदलत रहा
  3. तुमचा पासवर्ड हा कोणालही शेअर करू नका
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.