डिजिटल रेपची तक्रार, काय आहे हा प्रकार?

118

नोएडा पोलिसांनी एका 81 वर्षीय वृद्धाला डिजिटल रेप केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मौरिस रायडर असे या आरोपीचे नाव असून, तो एक चित्रकार आहे. आतापर्यंत सामान्य बलात्काराच्या आरोपाखाली अनेक आरोपींना गंभीर शिक्षा देण्यात आली आहे. पण डिजिटल रेपच्या आरोपाखाली अटक झाल्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे आता डिजिटल रेप म्हणजे आहे तरी काय? जबरदस्तीने व्हर्च्युअल संबंध ठेवण्याला डिजिटल रेप म्हणतात का, असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

17 वर्षीय मुलीवर अत्याचार

नोएडातील या प्रकरणात 17 वर्षीय पीडित मुलीसोबत राहणा-या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या मुलीवर 81 वर्षीय मौरिसने डिजिटल रेप केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलगी 10 वर्षांची असताना मैरिसने तिला आपल्या घरी आणले होते. तिला चांगले शिक्षण देण्याचे त्याने मुलीच्या वडिलांना सांगितले होते. मात्र तो त्या मुलीला मारहाण करुन तिचे यौन शोषण करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

(हेही वाचाः चुंबन घेणे लैंगिक गुन्हा नाही! काय म्हणाले उच्च न्यायालय?)

डिजिटल रेप म्हणजे काय?

लैंगिक अवयवांशिवाय इतर अवयव जसे की हाता पायाची बोटे, अंगठा किंवा इतर वस्तूंचा वापर करुन करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाला डिजिटल रेप म्हटले जाते. डिजिट आणि रेप या दोन शब्दांपासून हा शब्द तयार झाला आहे. इंग्रजीत डिजिट म्हणजे अंक, तसेच हातापायाची बोटे, अंगठा यांना डिजिट म्हटले जाते. या अवयवांचा वापर करुन शोषण केल्यामुळे डिजिटल रेप असे म्हटले जाते. 2013 मध्ये या संदर्भात एक अँटी रेप कायदा देखील तयार करण्यात आला आहे.

(हेही वाचाः तुम्ही कोणाला ‘टकल्या’ म्हणून चिडवताय? तर सावधान! कारण…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.