जागतिक रक्तदाब दिनानिमित्त सर ज. जी. रुग्णालयाच्या वतीने रक्तदाब शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अपर्णा संखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या समन्वयक समीक्षा गोसावी आणि हेमलता गजबे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वी केला. द्वितीय वर्ष बेसिक बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
( हेही वाचा : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे खाजगीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन )
रक्तदाब शिबिराचे आयोजन
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्राम कुलकर्णी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण शैलीने केले. या कार्यक्रमास, परिचर्या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, कर्मचारीही उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. रक्तदाबावर उपचार करून सफलता प्राप्त करु असे सांगत प्राचार्या डॉ. अपर्णा संखे यांनी उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, कशा पद्धतीने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास स्थानिक रहिवासी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये दीपक लाड, राजेश मोरे, संजय दुधमल, नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथींना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
Join Our WhatsApp Community