तुम्ही वापरताय ते दूध भेसळयुक्त तर नाही ना? कसे ओळखाल या आहेत काही टिप्स

167

घरातील तान्ह्या बाळापासून अगदी घरातील सर्व लोकांच्या आहारात दुधाचा वापर होत असतो. दुधात प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्व, आयोडिन असल्यामुळे डॉक्टर सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला देतात. परंतु घरी वापरात येणारे दूध किती प्रमाणात शुद्ध आहे याची पडताळणी करणे या काही सोप्या टिप्समुळे शक्य होणार आहे.

( हेही वाचा : मोबाईल डेटा लवकर संपतोय? लगेच बदला या सेटिंग्ज )

या आहेत भेसळयुक्त दूध ओळखण्याच्या काही टिप्स 

  • दुधात आयोडिनचे काही थेंब टाका जर दुधाचा रंग निळसर झाला तर दुधात भेसळ केली आहे असे समजावे.
  • दूध उकळल्यावर त्यात गाठी तयार झाल्यास दुधात भेसळ केली असल्याचे समजते. शुद्ध दूध आटले जाते त्याचा रंग बदलतो पण शुद्ध दुधात गाठी तयार होत नाहीत.
  • भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी त्यात सोयाबीन पावडर टाका. काही वेळाने त्यात लिटमस पेपर बुडवा जर पेपरचा रंग निळा झाला तर दुधात भेसळ केली हे सिद्ध होईल आणि रंग न बदलल्यास दूध शुद्ध असेल.

अशाप्रकारे भेसळ केली जाते…

  • आरोग्यासाठी आवश्यक असणारे पदार्थ काढून टाकत पाणी मिसळले जाते. यामुळे आरोग्यावर परिणाम होत नाही पण दुधातील पोषक द्रव्ये कमी होतात.
  • याउलट काहीवेळा दुधात पावडर मिक्स केल्या जातात याचा मात्र तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.