पंचकर्म केंद्राच्या नावाखाली देहव्यापार; दोघांना अटक

151

मुंबईत मागील काही वर्षांपासून अनेक ठिकाणी ‘आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र’ सुरु करण्यात आलेली आहेत. या आयुर्वेदिक पंचकर्म केंद्रात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण देखील मोठे आहे. मात्र आयुर्वेदिक पंचकर्माच्या नावाखाली काही ठिकाणी देहव्यापार सुरु असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर समोर आले आहे. भोईवाडा पोलिसांनी दादरच्या शारदा सिनेमा गृहाजवळ असलेल्या एका पंचकर्म केंद्रावर छापा टाकून एका महिलेची सुटका केली. पंचकर्म केंद्राच्या नावाखाली बेकादेशीर देहव्यापार करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलाढाल )

गुन्हा दाखल करून दोघांना अटक

दादर पूर्व येथील शारदा सिनेमागृहा जवळ ‘शारदा फार्मसी आयुर्वेदिक औषधी भांडार पंचकर्म केंद्र’ मागील काही वर्षांपासून सुरु आहे, या पंचकर्म केंद्रात मागील काही महिन्यापासून उपचार घेण्यासाठी येणाऱ्या पुरुष ग्राहकांना पंचकर्मच्या नावाखाली महिला पुरविल्या जात असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम बोगस ग्राहक पाठवून या ठिकाणी देहविक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरु असल्याची खात्री केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता एक महिला भेटली. महिला पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन, पंचकर्म केंद्राच्या नावाखाली देहव्यापार चालविणारे मोहम्मद वसीम अक्रम अन्सारी आणि अनिल कांबळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून या दोघांना अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेकडून हे दोघे वेश्याव्यसाय करून घेत होते, तसेच या दोघांच्या संपर्कात अनेक मुली आणि महिला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेले दोघे व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हा बेकायदेशीर धंदा करीत होते आणि ग्राहकांना व्हाट्सअँप वर महिलांचे फोटो पाठवून ग्राहकांना पंचकर्म केंद्रात बोलवत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.